Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रगुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाच्यावतीने लांजा येथे...

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाच्यावतीने लांजा येथे वह्या व पेन वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील गवाणे गावचे सुपुत्र, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे उपाध्यक्ष,ऑल इंडिया हायकोर्ट फेडरेशनचे सदस्य,गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष-समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाच्यावतीने लांजा येथील राजाराम सिताराम बेर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (सायन्स) साठवली तालुका लांजा येथे वह्या व पेन वाटप करण्यात आले.यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष- समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे,उपाध्यक्ष- सुभाष धनाजी रामाणे,सचिव अमोल मिस्त्री, सदस्य- रवींद्र कोटकर, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा तालुक्याचे उपाध्यक्ष- सुभाष पालकर, ग्रामस्थ- चिंतामणी सावंत यांच्यासहशिक्षक वर्ग,मुख्याध्यापक- श्री.जे.के.कांबळे, सहाय्यक शिक्षक एस .पी .कदम, सहाय्यक शिक्षक एस .पी .बादरे,सहाय्यक शिक्षक एस. पी .भालशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.हा उपक्रम ग्रामीण भागात घेतल्याबद्दल गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा यांचे अनेकांनी आभार व्यक्त करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments