Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रपत्रकार मित्र संघटनेच्या कार्यशाळेत माध्यम कर्मीचा सहभाग महत्त्वाचा- बाळकृष्ण कासार

पत्रकार मित्र संघटनेच्या कार्यशाळेत माध्यम कर्मीचा सहभाग महत्त्वाचा- बाळकृष्ण कासार

मुंबई (शांताराम गुडेकर ) : मुद्रित माध्यमांबरोबरच आता दूरदृश्य आणि समाज माध्यमांचा प्रभाव वाढलेला आहे.या संदर्भात माध्यम कर्मीकरिता धाराशिवमध्ये होत असलेल्या कार्यशाळेत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.अशी माहिती बाळकृष्ण कासार यांनी दिली. साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक देशभक्तचे संपादक लक्ष्मण शिंदे-पाटील यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.
ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल संघटनेच्या वतीने धाराशिव मध्ये नुकतीच बैठक घेण्यात आली.बैठकीत मार्गदर्शन करताना लक्ष्मण शिंदे-पाटील म्हणाले,गाव पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी अनेक आहेत.अडचणीच्या काळात पत्रकारांना संघटनेचे पाठबळ आवश्यक असते आणि कठीण काळात पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या संघटनेच्या वतीने धाराशिव मध्ये कार्यशाळा होत आहे, ही कौतुकाची बाब आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकारावरती झालेल्या भ्याड आल्यानंतर,पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रातील संपादक यासीन पटेल सरसावले आणि त्यांच्या माध्यमातूनच ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल संघटना १८ वर्षांपूर्वी उभी राहिली.या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील आणि धाराशिव जिल्ह्यातील माध्यम कर्मी करिता वेगवेगळे विषय कार्यशाळेतून हाताळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.तसेच संघटनेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण देखील याच कार्यक्रमात केले जाणार आहेत.अशी माहिती संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी बैठकीमध्ये दिली.संघटनेचे प्रदेश सरचिटणीस जी.बी.राजपूत,जिल्हाध्यक्ष विकास खाडे,अच्युत पुरी,जब्बार शेख,प्रदीप फरताडे,अल्ताफ शेख,निसार पटेल,कुंदन शिंदे, कैलास चौधरी आदींची बैठकीला उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments