
प्रतिनिधी(नितीन गायकवाड) : तापोळा
महाबळेश्वर तालुक्यातील भिमनगर गावचे सुपुत्र अभिजित भालेराव (गुरुजी) यानी अतिशय दुर्गम भागामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर सण १९८५ मध्ये कांदाटी खोऱ्यातील लामज या गावी शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर पुढे आपली सेवा करत असताना पुढे वेळापूर,भिमनगर तसेच चिखली या ठिकाणी सेवा देत असताना बढती मिळाली. त्यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. त्यानंतर वेंगळे,तापोळा,फलटण या ठिकाणी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आयु.अभिजित जानू भालेराव यांची विस्तारअधिकारी महाबळेश्वर तालुका पंचायत समिती बीट -तापोळा येथे नेमणूक झाल्याबद्दल महाबळेश्वर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भालेराव गुरुजी यांनी महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवले आहेत. या विद्यार्थ्यांकडून देखील गुरुजनांचे हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात आले आहे. शिक्षण कार्या सोबतच सामाजिक कार्यामध्ये देखील अभिजीत भालेराव गुरुजी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या संपूर्ण कार्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर भिमक्रांती व संघटना महाबळेश्वर यांच्याकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. समस्त भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.