
मुंबई : वरळी हिट अँड रनच्या दुर्दैवी अपघातात जीव गममावा लागलेल्या वरळी कोळीवाड्यातील कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची, पालकमंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांच्यासह मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी उपस्थित होते.
या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रशासनाला दिली असून कारवाईबाबत कोणतीही हयगय करण्यात येणार नाही, असेही यावेळी मंत्री केसरकर आणि शेवाळे यांनी कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले.