
लावणी कलावंत महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार अभिनेत्री नृत्यसमशेर माया जाधव यांना प्रदान
प्रतिनिधी : लावणी कलावंत महासंघाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रासह देशभर आपल्या नावाचा डंका गाजवणाऱ्या अभिनेत्री,नृत्यसमशेर माया जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार आमदार यामिनीताई जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी निर्माते शहाजी काळे, लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक संतोष लिंबोरे,अध्यक्ष सौ कविता घडशी,विश्वस्त जयेश चाळके, यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. लावणी क्वीन आकांक्षाकदम, पुरुष लावणी कलावंत प्रमोद कांदळकर,गोविंद हडकर – तालवादक, राधा धारेश्वर – पार्श्वगायिका, बाळासाहेब आहिरे – निर्माता, विठ्ठल कदम – शाहीर, यशवंत शिंदे – लोककलावंत बतावणी, सूचित ठाकूर – निवेदक, किरण काकडे – नृत्य दिग्दर्शक, उल्हास सुर्वे – नेपथ्यकार यांना महाराष्ट्र बाजार पेठेची संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे,चारूशीला घोलम, उद्योजक शिवाजी तोरणे यांच्या हस्ते लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कलाकार यांच्यामध्ये चिट्टी टाकून राजा राणी पुरस्काराचे मानकरी ठरवले जातात. तो मान यावर्षी श्री व सौ.सुचित्रा जयेश चाळके यांना देण्यात आला. यावेळी संपूर्ण नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरला होता. लावणी कलावंत महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य,लावणीवर प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.