Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशसाप्ताहिक संपादक आपल्या अधिकारांसाठी एकत्रितपणे लढा देणार ; साप्ताहिक संपादक असोसिएशनच्या बैठकीत...

साप्ताहिक संपादक आपल्या अधिकारांसाठी एकत्रितपणे लढा देणार ; साप्ताहिक संपादक असोसिएशनच्या बैठकीत निर्धार

प्रतिनिधी : समाजाची चळवळीचं जनक खऱ्या अर्थाने एकेकाळी साप्ताहिक वृत्तपत्राने ठरली होती ती साप्ताहिक आजच्या काळात प्रसाशनाच्या उदासीनतेमुळे उपेक्षित होत असताना विविध साप्ताहिक चे संपादक मंडळी एकत्रित येऊन साप्ताहिक संपादक असोसिएशन च्या माध्यमातुन साप्ताहिक संपादक आपल्या अधिकारांसाठी व आपल्या हककांसाठी प्रशासन साप्ताहिक वृत्तपत्रांवर दूजाभाव करत अनेक लाभापासून वंचित ठेवत असल्याकारणाने सर्व संपादक एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार ठाणे शासकिय गेस्ट हाऊस तेथे आयोजित साप्ताहिक संपादक असोसिएशनच्या बैठकीत कऱण्यात आला. ही बैठक राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी अनेक साप्ताहिकं वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष व मिशन जनकल्यांचे संपादक राजेश जाधव यांनी साप्ताहिक वृत्तपत्रांवर होत असलेल्या अन्यायबाबत सविस्तर माहिती दिले. दैनिक वृत्तपत्रे व साप्ताहिक वृत्तपत्रे समान अधिकार असताना साप्ताहिक वृत्तपत्रांना विविध अधिकारापासून अलिप्त ठेवून साप्ताहिक संपादकांवर प्रशासन अन्याय करत असल्याची भावना व्यक्त केले. त्यामुळे भविष्यात साप्ताहिक वृत्तपत्रे टिकवण्यासाठी साप्ताहिक संपादकांनी एकत्रित येऊन आपल्या अधिकाऱ्यांसाठी लढण्याचे आवाहन केले.
साप्ताहिक संपादक असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप यांनी सर्व संपादक एकत्रित येऊन चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर उपाध्यक्षा तथा आपला भगवाच्या संपादिका सारिका शिंदे यांनी साप्ताहिक संपादक यांच्या विविध समस्या मांडून आपण समस्या दूर करण्यासाठी आपण संघटीत होऊन लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी मंथनचे संपादक महेश अग्रवाल म्हणाले की, साप्ताहिक संपादक यांनी एकत्रित येऊन साप्ताहिकचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून तन-मंधनाने कार्य केले पाहिजे. बहुजन बुलेटिन चे संपादक बाबासाहेब खंडागळे यांनी शासन साप्ताहिक वृत्तपत्रांवर अन्याय करा असल्याची भावना व्यक्त करून प्रशासनाच्या या धोरणाविरुद्ध संपादकांनी जाब विचारला पाहिजे अशी भूमिका मंडळी. न्याय दरबारचे संपादक अशोक नाईक यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकवर ताशेरे ओढले आणि साप्ताहिक वृत्तपत्र यांनी आपल्या अधिकाऱ्यासाठी रस्त्यावर उचलून आंदोलन करण्याची सूचना केली. या बैठकीला विविध वृत्तपत्राचे संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments