प्रतिनिधी : सोमवारी मुंबईत जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे.
प्रतिनिधी : मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उघड्या पडल्या. देशाची आर्थिक राजधानीत दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते. रविवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा सोमवारी निर्माण होणार आहे. सोमवारी मुंबईत जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे.
मुंबईत रविवारी रात्री १ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ३३० मिमी पाऊस झाला आहे.
वीर सावरकर मार्ग 315.6, एमसीएमसीआर पवई 314.6, मालपा डोंगरी 292.2, चकाला 278.2, आरे वसाहत 259, नारीयलवाडी 241.6, प्रतिक्षानगर 220.2, नूतन विद्यामंदिर 190.6, लालबहादूर शास्त्र मार्ग 189, शिवडी कोळीवाडा 185.8, रावळी कॅम्प 176.3,धारावी 165.8
मुंबईतील या भागांमध्ये साचले पाणी
- गांधी मार्केट,वडाळा स्थानिक,एलबीएस,कुर्ला सिगनल,गोवंडी सिग्नल,शेल कॉलनी,अंधेरी सबवे,बोरिवली पूर्व,अंधेरी मार्केट