प्रतिनिधी : नवतरुण सेवा मंडळ कोळबांद्रे दवंडेवाडी (रजि.) हे मंडळ सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत असतानाच सातत्याने प्रत्येक वर्षी अनेक उपक्रम राबवत असते. त्यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, मार्गदर्शन शिबिरे,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम राबविले जातात. यावर्षी मंडळाने झाडे लावा- झाडे जगवा या अंतर्गत मंडळाच्या स्वखर्चाने वृक्षारोपण कार्यक्रम घेतला व यशस्वी रित्या नियोजन करून २०० झाडे एका दिवसामध्ये लावण्याचा आपला मानस पूर्ण केला.

या उपक्रमासाठी मुंबई मंडळ व ग्रामीण मंडळाने खूप मेहनत घेतली. या उपक्रमाला मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मा.सुरेश दवंडे, सरचिटणीस रवींद्र खळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय खळे, खजिनदार प्रकाश दवंडे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष महिपत खळे, सरचिटणीस दशरथ बेर्डे, कार्याध्यक्ष दशरथ दवंडे, खजिनदार विलास दवंडे, मा. ग्राम अध्यक्ष कृष्णा बेर्डे, माजी सैनिक मनोहर हरावडे, कमलाकर खळे, जयेश खळे, शांताराम खळे, अनंत खळे, काशीराम खळे, यशवंत खळे, महादेव दवंडे, शांताराम दवंडे, पांडुरंग दवंडे, प्रफुल्ल दवंडे, मनोहर दवंडे, रामचंद्र खळे, राजेश हरावडे, तानाजी बेर्डे, प्रमोद बेर्डे, राजेश बेर्डे, राजेश घडवले तसेच वाडीतील ग्रामस्थ मंडळी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सर्वांचे आभार मानून करण्यात आली.