प्रतिनिधी : मागील वेळी तू वाचला होता. आता तुला सोडणार नाही. जिथे दिसशील तेथे बंदुकीच्या गोळ्या घालीन,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना एका वाळू माफियाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. कोळी यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.
शरद कोळी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासह त्यांचे सोलापुरातील संपर्क कार्यालयही जाळून टाकण्याची धमकी या वाळू माफियाने दिली आहे. शरद कोळी हे ठाकर गटाचे सोलापूरमधील उपनेते आहेत.
फिर्यादीनुसार, शरद कोळी यांनी यापूर्वी वाळूमाफियाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देऊन कारवाई करण्यास भाग पाडले आहे, त्याचा राग मनात धरून शनिवारी सायंकाळी संतोष पाटील यांच्या फोनवर अण्णाराव ऊर्फ पिंटू पाटील (रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांनी फोन केला होता.
गेल्या वेळी काही लोक अंगावर घालून तूला गोळ्या घातल्या होत्या, परंतु त्यातून तू वाचला होता. आत्ता तुला सोडणार नाही, जिथे दिसेल तिथे तुला बंदुकीच्या गोळ्या घालण्यात येतील, त्यासंदर्भात काही लोकांना मी सांगितले आहे. तसेच, शरद कोळी यांचे सोलापूर येथील संपर्क कार्यालयही जाळून टाकीन, अशी धमकी अण्णाराव पाटील यांनी संतोष पाटील यांच्या फोनवरून शरद कोळी यांना दिली आहे.