प्रतिनिधी(मंगेश कवडे) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये मोडरगाम आणि चिन्निगाम येथे शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र, अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा जवान शहीद झाला. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली असता ही घटना घडली.जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेला जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ याच्या कुटुंबीयांना रेजिमेंटकडून माहिती देण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती प्राप्त झाली नव्हती. प्रवीण जंजाळ हा सेकंड महार रेजिमेंटमध्ये २०२० मध्ये भरती झाला होता. त्याची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात येथे त्याला पाठविण्यात आले होते. या पथकासोबतच कुलगाम जिल्ह्यातील मोडरगम येथे शनिवारी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. येथे सहा दहशतवादी असल्याची माहिती होती. चौघांना ठार केल्यानंतर कुलगाम येथील ही चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चकमक सुरू असल्यामुळे दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले नव्हते. शोधमोहीम सुरू असताना लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा; अकोल्याचा प्रवीण जवान शहीद
RELATED ARTICLES