Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रआषाढी वारीसाठी पंढरपूर मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी डोंबिवली येथील मास्टर ट्रेनर्स

आषाढी वारीसाठी पंढरपूर मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी डोंबिवली येथील मास्टर ट्रेनर्स

प्रतिनिधी : डोंबिवली येथील आपत्ती व्यवस्थापन मास्टर ट्रेनर्स यांचे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रशासकीय तथा सुरक्षा कर्मचारी व होमगार्ड यांचेसह सेवाधारि सदस्य यांना आषाढी वारी च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व गर्दीचे नियंत्रण/ नियोजन या विषययावर प्रशिक्षण सत्र.
मा. अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा आपत्तीव्यवस्थापनअधिकारी श्री शक्तिसिंग ढोले ( सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती-पंढरपूर यांच्या वतीने आयोजित आषाढी वारी च्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियंत्रण/ नियोजन तसेच संभाव्य दुर्घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन च्या दृष्टीने आपत्कालीन रुग्ण वाहून नेण्याच्या पद्धती व पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला देण्याच्या कृत्रिम श्वसन पद्धती या विषयांवर प्रशिक्षण दिनांक ०५ \०७ \ २०२४ रोजी आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून डोंबिवली येथील आपत्ती व्यवस्थापनचे अनुभवी मास्टर ट्रेनर व राष्ट्रपती पदकाने सन्मानित श्री बिमल नथवाणी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन मास्टर ट्रेनर श्री हनुमान चौधरी आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ किशोर आढळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.. तसेच सदर प्रशिक्षण सत्रास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांच्यासह समितीच्या विश्वस्त सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे या देखील उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद पाटील यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले. सदर संपुर्ण प्रशिक्षण सत्राचे संपूर्ण नियोजन श्री भाऊसाहेब घोरपडे यांनी अतिशय सुरेखपणे केले होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments