मुंबई : संवेदनशील मनाचे काशिनाथ माटल यांनी कामगार चळवळीत स्वतःला वाहून घेताना एसटी कामगारांच्या व्यथा कथेतून मांडल्या आणि त्यांच्या मध्ये लढण्याची जिद्द आणि उर्जा निर्माण केली,असे गौरवोद्गार “महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस”चे अध्यक्ष ज्येष्ठ कॉंग्रेसनेते आमदार भाई *जगताप यांनी काशिनाथ माटल यांचा गुणगौरव करतांना म्हटले आहे!* राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क प्रमूख आणि ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांनी,एसटी कामगारांच्या व्यथा मांडलेली "खेळ मांडियेला नवा"ही कथा बहुतांश कामगारांना प्रेरक ठरली आहे.त्या बद्दल नुकतेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्याहस्ते त्यांना शाल-पुष्पगुच्छ आणि एसटीची प्रतिकृती असलेले स्मृतीचिऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र एसटी कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे शैक्षणिक शिबीर दादरच्या टिळक भवन येथील कॉंग्रेस प्रदेश कार्यालयात पार पडले.या प्रसंगी अध्यक्षस्थानीआमदार भाई जगताप होते.प्रारंभी युनियनचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी अभ्यासपूर्ण प्रास्थाविक केले.विशेष कामा बद्दल सघटनेचे पदाधिकारी संजिव विकुर्डेकर आणि अन्य सन्मानिययांचाही गुणगौरव करण्यात आला.
सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले,काशिनाथ माटल यांनी कथासंग्रहातील “खेळ मांडियेला नवा” या शिर्षक कथेमधून एसटी कामगारांच्या जीवनाचा अचूकपणे वेध घेऊन कामगारांविषयी आपलेपणा जतन केला होता.
लेखक काशिनाथ माटल म्हणाले,”खेळ मांडियेला नवा”शीर्षक कथासंग्रहाला महाराष्ट्रातील तीन मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळाले.परंतु एसटी कामगारांच्या गौरवाने पुस्तकाचे मोल अधिकच द्विगुणित झाले आहे.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे प्रोत्साहन तितकेच मोलाचे ठरले आहे.
गणित कुठे चुकतेय?
अध्यक्ष आमदार भाई जगताप कामावर प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना म्हणाले, हजार वेळा संप करून पदरात काहीच पडत नसेल तर आपले गणित कूठे तरी चुकते आहे.ती चुक सुधारण्यासाठी सर्वच कामगार संघटनांनी पुन्हा एकत्र यावयास हवे.निदान जो सरकारी नोकरांना आर्थिक लाभ मिळतो तेवढा तरी एसटी कामगारांना मिळावयास हवा.सातव्या वित्त आयोगाच्या शिफारशींचा लाभ एसटी कामगारांना मिळावयासच हवा,तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.
कामगारांचा थकीत पगार,शासकीय कर्मचा-यां प्रमाणे महागाईभत्ता, घरभाडेभत्ता मिळावयास हवा,अशी मागणी करून,कामगार संघटनांनी केवळ तात्पुरत्या तडजोडीवर भुलून नजाता निष्ठा वाहिलेल्या कामगारांच्या
भल्याचा अधिक विचार करावयास हवा.
कामगार प्रशिक्ष णासाठी राज्यभरातील कर्मचारी उपस्थित होते.