Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोकण सुपुत्र समाजसेवक चंद्रकांत करंबळे पुणे येथे"लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड"पुरस्काराने सन्मानित

कोकण सुपुत्र समाजसेवक चंद्रकांत करंबळे पुणे येथे”लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”पुरस्काराने सन्मानित

मुंबई (उत्कर्ष गुडेकर ) : आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना,युवा महाराष्ट्र फॉउंडेशन,पोलीस मित्र माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने “आयकॉन महाराष्ट्र पुरस्कार -२०२४ तसेच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान पुरस्कार वितरण सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घुले रोड,बालगंधर्व जवळ,पुणे येथे भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते थाटामाटात पार पडला.या थाटामाटात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात भारतातील अनेक राज्यातील सामाजिक,पर्यावरण,आरोग्य,शिक्षण,पोलीस,पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित होत्या.यामध्ये मुंबई येथील बोरिवली पश्चिम येथील माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य, माहिती अधिकार,पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी मुंबई जिल्हा,पत्रकार,समाजसेवक डॉ.समीर खाडिलकर यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली तर लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळ यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड “पुरस्कार तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली गावचे सुपुत्र श्री. शांताराम ल. गुडेकर (मा. विशेष कार्यकारी अधिकारी -महाराष्ट्र शासन )यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल “उत्कृष्ट पत्रकारिता “पुरस्कार -२०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्यांसह सभागृहमध्ये जितेंद्र वारेशी उच्च न्यायालय असि. कक्ष अधिकारी,अतुल आग्रे,राहुल आग्रे,धैर्यशील कदम ,सौ. सुजाता कदम,सौ.दर्शना करंबळे,सौ.दिपाली करंबळे, व आग्रे परिवार उपस्थित होते.
तसेच यावेळी सफाई कामगार महिलांचाही सत्कार करण्यात आला.मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमचे आयोजन डॉ.अविनाश धनंजय सकुंडे,राष्ट्रीय अध्यक्ष-भारतीय महा क्रांती सेना.आंतरराष्ट्रीय अध्यक्ष-आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना,आंतरराष्ट्रीय अध्यक्ष -पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना, श्री.गणेश विटकरआणि सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद यांनी केले होते.उपस्थित सर्व मान्यवर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.कोकण सुपुत्र समाजसेवक डॉ.समीर खाडिलकर,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत करंबळे, पत्रकार शांताराम गुडेकर पुणे येथे पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल कोकणसह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणेमधील अनेक मंडळ,कुणबी समाज शाखा,मुंबई /ग्रामीण गाव, वाडी मंडळ, रहिवाशी, मित्र परिवार आणि हितचिंतक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments