प्रतिनिधी : पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे आता वसंत मोरे हे येत्या 9 जुलै रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांनी वयाच्या 18 ते 19 व्या वयात शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेची पुणे मतदारसंघात शाखा उभारली होती, असं वसंत मोरे म्हणाले होते. त्यामुळे आता वसंत मोरे हे लवकरच मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार असल्याचे म्हटले जात आहे.
कुठल्याही प्रलोभनापोटी मी शिवसेना पक्षात जात नाही. उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेल विधानसभा की महानगरपालिका लढवायची आहे हे लवकरच ठरवेल असं वसंत मोरे म्हणाले आहेत. पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणे न देणे, माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे सगळे लक्षात घेता वंचित पक्ष सोडला.
https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?gdpr=0&client=ca-pub-1852636686229204&output=html&h=327&adk=493449880&adf=1397690312&w=393&abgtt=7&lmt=1720189474&num_ads=1&rafmt=1&armr=3&sem=mc&pwprc=2102281032&ad_type=text_image&format=393×327&url=https%3A%2F%2Fwww.thodkyaat.com%2Fvasant-more-message-to-prakash-ambdekar-after-leave-vanchit-bahujan-aghadi-party%2F&host=ca-host-pub-2644536267352236&fwr=1&pra=3&rh=278&rw=333&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=27&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTEuMC4wIiwiIiwiUmVkbWkgTm90ZSA4IFBybyIsIjEyNi4wLjY0NzguMTIyIixudWxsLDEsbnVsbCwiIixbWyJOb3QvQSlCcmFuZCIsIjguMC4wLjAiXSxbIkNocm9taXVtIiwiMTI2LjAuNjQ3OC4xMjIiXSxbIkdvb2dsZSBDaHJvbWUiLCIxMjYuMC42NDc4LjEyMiJdXSwwXQ..&dt=1720190414682&bpp=8&bdt=3148&idt=-M&shv=r20240702&mjsv=m202406260101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D1894f0957c60428a%3AT%3D1704205812%3ART%3D1718203254%3AS%3DALNI_MZXuqmrAsXgGjrQM9s51m16k6tL9g&eo_id_str=ID%3Df0a143dc24b60758%3AT%3D1711539181%3ART%3D1718203254%3AS%3DAA-AfjZLfJd808Z-AehHZ2Kzyuim&prev_fmts=0x0&nras=2&correlator=3900985066669&frm=20&pv=1&ga_vid=798855696.1704205718&ga_sid=1720190414&ga_hid=2037246803&ga_fc=1&u_tz=330&u_his=1&u_h=851&u_w=393&u_ah=851&u_aw=393&u_cd=24&u_sd=2.75&dmc=8&adx=0&ady=1718&biw=393&bih=720&scr_x=0&scr_y=1049&eid=44759842%2C44795922%2C95330410%2C95330414%2C95334511%2C95334524%2C95334566%2C31084926%2C31078663%2C31078665%2C31078668%2C31078670&oid=2&pvsid=664225079020151&tmod=1073842387&uas=0&nvt=1&fc=1408&brdim=0%2C0%2C0%2C0%2C393%2C0%2C393%2C720%2C393%2C720&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&cms=2&fu=128&bc=31&bz=1&td=1&tdf=2&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&ifi=2&uci=a!2&fsb=1&dtd=195
लोकसभा निवडणुकीत देखील काही कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही. त्यामुळे आपले काही कार्यकर्ते नाराज असल्याचं वसंत मोरे म्हणाले. याबाबतची माहिती देखील त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली होती. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.
“प्रकाश आंबेडकरांना लोकशाही मान्य असावी”
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांच्यावर संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना लोकशाही मान्य असावी असं संजय राऊत म्हणाले. वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले. निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण दुसऱ्या पक्षात जातात. निवडणूक लढवायला गोपीचंद पडळकरही गेले होते मग त्यांचं काय? असा सवाल आता संजय राऊत यांनी केला आहे.
लोकशाही आणि राजकारणात लोकं पक्षांतर करतात तसेच लोकं भूमिका देखील बदलतात. या देशात लोकशाहीचा पाया हा प्रकाश आंबेडकर यांनी रचला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना लोकशाही मान्य असायला हवी, असं संजय राऊत म्हणाले आहेत.