प्रतिनिधी : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यृ झाला होता. तर याच रुग्णालयात आता महिनाभरात याच रुग्णालयात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. या नवजात बालकाचा मृत्यू कमी वजनामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिलं आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने हे रुग्णालय चर्चेत आले होते. त्यानंतर पुन्हा एका महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या घटनेनंतर कळवा रुग्णालयातील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतरही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्णालयाचा ताण आजही कमी झाला नसल्याचेच दिसून आले आहे. रुग्णालयात ५०० खाटा आहेत. रुग्णालयात दररोज साडेचारशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. सध्या, नवजात अतिदक्षता विभागात एनआयसीयूमध्ये ३० खाटा आहेत, त्यापैकी २० खाटा रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदणीकृत महिलांसाठी राखीव आहेत, तर उर्वरित दोन ठाणे, पालघर आणि रुग्णांचा भार हाताळण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान जानेवारी २०२४ मध्ये अशा १७ नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर मार्च महिन्यात १०, एप्रिल महिन्यात २४, १६ तर जून महिन्यात अशा २१ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. एकूण ८९ नवजात बालकांची माहिती समोर आली आहे, जून महिन्यात प्रथम स्तरावरील रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती झालेल्या ५१२ महिलांपैकी ९० नवजात बालके गंभीर आजारी असल्याचे आढळून आले, त्यापैकी २१ मृत जन्माच्या वेळी, काही खूप गंभीर होते आणि १९ नवजात बालके कमी वजनाची कमी वजनाची होती. नऊ महिन्यांच्या वयात १५ मुलांचा जन्म झाला, त्यापैकी निम्म्या मुलांचा जन्म हॉस्पिटलच्या बाहेर झाला आणि ६ नवीन जन्मलेल्या मुलांचा जन्म हॉस्पिटलच्या बाहेर झाला. यापैकी १३ नवजात बालकांचे वजन १.२ किलोपेक्षा कमी झाले असते किंवा त्यांचे वजन ४८ सेकंद होते असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.