Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रइंडियन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्सची "खासी, खोकल्या" विरोधात विशेष मोहिम लहान मुलांना भेडसावणा-या...

इंडियन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्सची “खासी, खोकल्या” विरोधात विशेष मोहिम लहान मुलांना भेडसावणा-या विविध गंभीर आजारांबाबत विशेष मोहिम

मुंबई :  इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AP) ही विविध उपक्रमातंर्गत वेगवेगळ्या विषयावर पालक तसेच नागरिकाध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवून विविध कार्यक्रम राबत असते. लठ्ठपणा, गोवर, ऑटिझम, डाउन सिंड्रोम आणि घंलेसेमिया यांसारख्या विषयांवर उपक्रम राबवित्यानंतर आयएपीने आता खोकल्‌याचा वाढता थोका आणि त्याच्याशी सबंधित गुतागुतीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी टँकलिंग कफ विथ केअर या ८व्या राष्ट्रीय जागरूकता मोहीमेस सुरुवात केली आहे.

“आयएपी की बात, कम्युनिटी के साथ या संकल्पनेतर्गत बाल आरोग्याविषयक गंभीर समस्यांबाबत समाजात सर्वच स्तरांवर जनजागृती केली जाते. २०२४ आणि २०२५ च्या उपक्रमातंर्गत बात आरोग्याविषयी महत्वाची माहिती प्रसारित करण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मुलामध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये आणि अगनवाडी, नर्सरीमध्ये जाणाऱ्या वयोगटात खोकला ही सर्वात सामान्य आढळून येणारी आरोग्य समस्या आहे. वातावरणातील बदत, त्यामुळे होणारा संसर्ग आणि ऍलर्जी ही खोकल्‌याची सर्वात सामान्य कारणे आहेत. संसर्गजन्य आजारावर वेळीच लसीकरण हे संरक्षणाच्या दिशेने एक सकात्मक पाऊल ठरत आहे. मुलाना खोकल्‌यासंबंधी विशेष काळजी, खोकताना आपल्यामुळे इतराना जंतू संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक माहिती पालक आणि संबंधित घटकास दिल्यास हा संसर्ग रोखण्यास मदत होते. घरामध्ये खोकल्‌यास कारणीभूत ठरणा-या घटकावर निर्बंध अथवा काळजी घेतल्यास तंबाखूचा धूर, स्ट्रोंग परफ्यूम, डिओइंट्स, अगरबत्ती अॅलर्जीक खोकला कमी करण्यास मदत करते. बहुतेक मुलामध्ये, खोकता सहसा तीन आठवड्यांच्या आत कमी होतो. दीर्घकाळ आणि सतत राहिल्‌यास झोप, दैनदिन किया आणि आहारात व्यत्यय आणत असल्‌यास, त्याची तपासणी तज्ञांकडून करणे आवश्यक आहे.

बालरोगतज्ञ आवश्यक असल्यास मुलांच्या छातीचा एक्स-रे किंवा रक्त चाचण्यांसारख्या तपासणीची शिफारस करतात. लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, ओव्हर-द-काउंटर OTC) खोकल्‌यावरील सिरप बहुतेक मुलांसाठी अनावश्यक ठरतात आणि अयोग्यरित्या वापरल्यास ते हानिकारक ठरु शकतात. उपयुक्त औषधांमध्ये ऍलर्जीक खोकल्‌यासाठी ब्रोन्कोडायलेटर्स आणि पोस्ट-नसाल ड्रिपसाठी अँटीहिस्टामाइन सिरप समाविष्ट आहेत. मध आणि उबदार द्रव यासारखे घरगुती उपचार सामान्यतः मुलासाठी उपयुक्त ठरतात.

डॉ. जी. व्ही. बसवराजा राष्ट्रीय आयएपी अध्यक्ष 2024) सागतात की, “आयएपी की बात, कम्युनिटी के साथ मोहीम देशभरातील मुलाचे आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहे. 3 महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकल्‌यासारखी श्वसनासंबंधी विकारांची लक्षणे आहेत प्रतिजेविकांच्या सततच्या गैरवापरामुळे 40% मुलाना श्वासोच्छवासाच्या संसर्गाचा त्रास होत आहे. वैद्यकीय तज्ञांसाठी आयएपीव्दारे वैद्यकीय प्रशिक्षण उपक्रम आयोजित करून आम्ही खोकल्‌याबद्दल अचूक आणि विश्वासार्ह माहिती प्रदान करत, पालक आणि नातंवाईकांना मुलांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करत आहोत.

डॉ. वसंत खळटकर (राष्ट्रीय अध्यक्ष 2025) पुढे सांगतात की, “विविध उपक्रमांद्वारे आणि व्यापक प्रसाराद्वारे, खोकल्‌यासारख्या आरोग्य समस्यांना दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जे मुलाच्या सपूर्ण आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे.
या मोहिमेचे डॉ एस नागभूषण, डॉ. वी एस शर्मा, डॉ. शिल्‌पा हजारे, डॉ. इंद्रनील हलदर, डॉ. पवन कल्‌याण पी, यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या प्रतिष्ठित चमूसह डॉ पियाली भट्टाचार्य, डॉ गायत्री यांचा समावेश असलेली वैज्ञानिक समिती वेझवोरुआ, डॉ. प्रशांत ही कारिया, डॉ. मुवशीर हसन शाह, डॉ चेरुकुरी निर्मला आणि डॉ. मनमीत कौर सोटी यांचा समावेश आहे डॉ जी की बसवराजा, डॉ वसंत खलाटकर, डॉ. योगेश पारीख, डॉ. अतनु भद्रा, आणि राष्ट्रीय समन्वयक डॉ गीता पाटील, डॉ. समीर दलवाई, डॉ. किशोर वैद्रर, डॉ. शांताराज, आणि डॉ. अमरेश पाटील यासह प्रमुख आयएपी अधिकारी या मोहिमेचा एक भाग म्हणून जनजागृती फलक आणि व्हिडिओचे अनावरण केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments