प्रतिनिधी : भारत हा क्रिकेटवेडा देश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिकेटची चर्चा सर्वत्र होत असते. मग ती ट्रेन असो, मैदान असो की आणखी काही..घरात सर्वच जण आवडीने क्रिकेट पाहात असतात. त्यामुळे लहानपणापासूनच क्रिकेट बाळकडू मिळतं. त्यामुळे क्रिकेट आणि भारतीयांचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे आयसीसी चषक जिंकला तर आनंद तर होणारच..दिल्ली असो की मुंबई सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष होत आहे. टीम इंडियाचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मरीन ड्राईव्हवर निघालेल्या ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढली. यावेळी इतका सारा जनसमुदाय पाहून क्रिकेटपटूही भारावून गेले. काही खेळाडूंना तर या वेडेपणाची अनुभूती पहिल्यांदाच आली असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांनी टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. हा सर्व जल्लोष पाहून क्रिकेटपटूही भारावून गेले. रोहित शर्मालाही स्वत:ला आवरणं कठीण झालं. रोहित शर्मा चाहत्यांच्या गराड्यात गेला आणि ढोलताशांच्या ठेक्यावर ताल धरला. त्याच्या या कृतीमुळे क्रीडारसिक खूश झाले
वानखेडे मैदानावर पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा डान्स सुरुच होता. सर्वच खेळाडू नाचताना दिसले. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा या सर्वांनीच डान्स केला. ही दृष्य पाहून प्रत्येक भारतीय भारावून गेला. 2007 साली अशीच अनुभूती आली होती. मरीन ड्राईव्हसवरून वानखेडे स्टेडियमवर विजयी रॅली काढण्यात आली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात विजय मिळवून पुन्हा तीच अनुभूती आली. मुंबईत सर्वत्र आनंदोत्सव पाहायला मिळाला.