Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रशिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशुविहार आगाशिवनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश

शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशुविहार आगाशिवनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश

प्रतिनिधी : इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेत आग्रही असणाऱ्या आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशुविहार आगाशिवनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. 

  यामध्ये इयत्ता पाचवी मधील अनघा अतुल काकडे हिने(राज्यात १७ वा तर तालुक्यात २ रा )क्रमांक मिळवला,इयत्ता पाचवी मधील गौरव मधुकर शेलार याने(तालुक्यात १२वा. जिल्ह्यात ३०वा)क्रमांक मिळवला तर इयत्ता-आठवी मधील वैष्णवी राजेंद्र पांढरपट्टे हिने (तालुक्यात ३रा व जिल्ह्यात २८ वा) क्रमांक प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

            या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अश्विनी पाटील,रंजना कांबळे,प्राजक्ता पाटील, रफिक सुतार, वैभव शिर्के,नंदा पानवळ, शबाना मुल्ला, सोपान जगताप,अश्विनी यादव,रूपाली कुंभार,जयमाला पाटील,मेघा बाटे,शितल भिसे,कोमल शिर्के,सोनिया पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन शिंदे,आदर्श शिशु विहारच्या मुख्याध्यापिका श्रीमती‌ लता नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील,क उपाध्यक्ष भास्करराव पाटील , खजिनदार  तुळशीराम शिर्के ,संचालक वसंतराव चव्हाण , संचालिका डॉ. स्वाती थोरात ,संचालक संजय थोरात यांनी यशस्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .

चौकट

           सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देत गुणवत्ता हेच अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगरने सुरू केलेला आदर्श गुरुकुल पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरतोय

  अतुल काकडे  (पालक प्रतिनिधी)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments