Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रएका चुकीमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून राहू शकता वंचित, ही गोष्ट केलीय...

एका चुकीमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून राहू शकता वंचित, ही गोष्ट केलीय का?; नसेल तर आजच करा

प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सध्या सर्वत्र बोलबोला सुरु आहे. या योजनेसाठी आता राज्यातील लाखो महिला अर्ज दाखल करत आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. राज्यातील गरीबाना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या घरात असायला हवं. पण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं जास्त आवश्यक आहे. संबंधित पूर्तता केली नाही आणि तसाच अर्ज दाखल केला तर ती चूक ठरु शकते. यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता. त्यामुळे अर्ज भरताना काही गोष्टींची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे.

योजनेसाठी ‘ही’ गोष्ट लगेच करा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात आधी लाभार्थी महिलेचं बँकेत खातं असणं अपेक्षित आहे. फक्त बँकेत खातं असून चालणार नाही तर महिलेचा आधार क्रमांक त्या बँक खात्याशी जोडला गेलेला असायला हवा. तसं नसेल तर हा अर्ज भरला जाणार नाही. त्यामुळे लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याआधी लाभार्थी महिलेचं बँकेत खातं असायला हवं. तसेच त्या बँक खात्याशी आधारकार्ड नंबर जोडला गेला असायला हवा. त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्याशी त्यांचं आधारकार्ड नंबर जोडला गेला नसेल त्यांनी लगेच ते करणं जरुरीचं आहे.

महिलांना मिळणार मोठा दिलासा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची अर्थिक मदत मिळणार आहे. पण या योजनेचा लाभ घेणारी महिला ही गरीब कुटुंबातील असायला हवी. या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीत लाखांच्या आत असणं अपेक्षित आहे. तसेच कुटुंबातील कुणी आयकरदाता नसावा. कुटुंबातील सदस्याच्या नावावर कोणतीही चारचाकी गाडी (ट्रॅक्टर वगळता) नसावी. सरकारच्या या अटी पाहता गरीब आणि होतकरु कुटुंबातील महिलांना या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो. या योजनेच्या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काय-काय विचारण्यात आलं आहे याची माहिती आता समोर येत आहे.

अर्जामध्ये काय-काय विचारलंय?

महिलेचे संपूर्ण नाव-
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
महिलेचे लग्नानंतरचे नाव
जन्म दिनांक: दिनांक/ महिना/वर्ष-
अर्जदाराचा संपूर्ण पत्ता-
जन्माचे ठिकाण –
जिल्हा-
गाव/वाहर
ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका-
पिनकोड
मोबाईल क्रमांक-
आधार क्रमांक-
शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय/नाही. असल्यास, दरमहा रु.
वैवाहिक स्थिती
विवाहित/ घटस्फोटीत/ विधवा/ परितत्क्या/ निराधार
अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या बैंकेया तपशील-
बँकेचे पूर्ण नाव –
बँक खाते धारकाये नाग
बँक खाते क्रमाक
IFSC कोड
आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? होय किंवा नाही
Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार :
१) अंगणवाडी सेविका
२) अंगणवाडी मदतनीस
३) पर्यवेधिका
४) ग्रामसेवक
५) वार्ड अधिकारी
६) सेतू सुविधा केंद्र
६) सामान्य महिला
सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी,
१) आधार कार्ड
२) अधिवात/जन्म प्रमाणपत्र
३) उत्पन्न प्रमाणपत्र
४) अर्जदाराने हमीपत्र
५) बँक पासबुक
६) अर्जदाराचा फोटो

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments