Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशसत्संग कार्यक्रम बनले मृत्यूचे घर!११६ हुन अधिक मृत्यु

सत्संग कार्यक्रम बनले मृत्यूचे घर!११६ हुन अधिक मृत्यु

प्रतिनिधी (मंगेश कवडे) : उत्तरप्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात आयोजित नारायण साकार विश्व हरी ऊर्फ भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. अन् अक्षरशः मृत्यूचे तांडव घडले. या दुर्दैवी घटनेत ११६ हून अधिक भाविक मृत्युमुखी पडल्याची पुष्टी अलिगडच्या आयुक्तांनी केली. मृतांमध्ये बालके व महिलांचा समावेश आहे. या घटनेत २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी व रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा अक्षरशः खच पडल्याचे पहायला मिळाले. घटनास्थळावरील हृदयद्रावक दृश्ये पाहून एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी

दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली. या विषयी सविस्तर वृत्त असे की, यूपीच्या हाथरस जिल्ह्यापासून४७ किमी दूरस्थित फुलरई गावात मानव मंगल मिलन समागम समितीने नारायण साकार विश्व हरी नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबा यांचे सत्संग (प्रवचन) ठेवले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने गावात दाखल झाले. कार्यक्रमास्थळी प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा कैक पट अधिक सुमारे ५० हजार भाविक जमले. सत्संग संपल्यानंतर भाविक परत जात असतानाच अचानक चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या वेळी एकमेकांना पायदळी तुडवत लोक पुढे गेले. त्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ माजली. दुर्दैवाने महिला व बालकांसह अनेकांना प्राण गमावला आहे,

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments