
तळमावले(डाॅ.संदीप डाकवे) : मानेगाव मध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी श्री.अधिक मारुती माने यांच्या दहा गुंठे क्षेत्रामध्ये सफरचंद लागवडीस प्रारंभ झाला. हा प्रयोग पाटण तालुक्यातील पहिला प्रयोग आहे. यासाठी माने यांनी दोन वर्षे वयाची “हार्मोन 99” या जातीची 170 रोपे लागवडीस आणली आहेत. त्यांची लागवड आठ बाय दहा फुटावरती करण्याचे आहे. लागवड करण्यापूर्वी त्यांनी मे महिन्यामध्ये तीन बाय तीन आकाराचे खड्डे काढले होते आणि त्या खड्ड्यामध्ये 35 टेलर बंधाऱ्यातील गाळ भरला व प्रत्येक खड्ड्यांमध्ये दोन पाठी शेणखत टाकून घेतले होते आणि आता 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून लागवड करण्याचं नियोजन केले आहे, आत्ता लागवडीच्या वेळी खड्ड्यामध्ये सुफला व बुरशीनाशक पावडरचा वापर केला आहे व त्यामध्ये रोपांची लागवड करण्याचे नियोजन आज केले होते. लागवडी पर्यंत 65 हजार रु.पर्यंत चा खर्च आला आहे. सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होईल असे प्रमुख मार्गदर्शक व उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी जालिंदर दडस; मु.पो. काटेवाडी, ता.माण यांनी सांगितले. लागवडीच्या दरम्यान मार्गदर्शन ऐकण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर व पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शंकर शेडगे. पंचायत समिती पाटणचे कृषी अधिकारी लोखंडे साहेब, प्रगतशील शेतकरी श्रीकांत भिंगारदेवे, मानेगावचे सरपंच जालिंदर माने, निनाई देवी कारखाना चे कृषी अधिकारी मराठे, पिंटू जाधव, रवींद्र माने, उत्तम जाधव, राहुल वीर, प्रणव मोरे, सुरेखा निकम, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, मानेगावचे तलाठी अमोल बुरकुडे, मंडल अधिकारी एस. आर.देशमुख, कृषी पर्यवेक्षक एम.के.आगवणे, कृषी सहाय्यक जी.डी. सावंत, व्ही.व्ही.जंगम, सफरचंद हे काश्मीर-हिमाचल या थंड प्रदेशातील फळ असून या फळबागेचा आपल्या परिसरात लागवड करून त्याचे उत्पन्न घेण्याचे धाडस प्रयोगशील शेतकरी अधिकराव माने यांनी केले आहे. त्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी व कृषी अधिकाऱ्यांनी व सर्व शेतकरी बांधूनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक सुभाष माने यांनी केलं. डॉ .सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.