Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जात मुदतवाढ ३१  ऑगस्टपर्यंत वाढवली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जात मुदतवाढ ३१  ऑगस्टपर्यंत वाढवली

प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.
विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

  उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला ऐवजी रेशन कार्ड,मतदान कार्ड चालेल,त्यामुळे रांगा लावण्याची आवश्यकता नाही असे बदल केले आहेत.

RELATED ARTICLES

3 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments