प्रतिनिधी : माजी मंत्री आमदार यशोमती ताई ठाकूर यांच्या पुढाकाराने धनगर समाजाच्या मागण्या घेऊन समाजाचे नेते अॅड. दिलीप एडतकर यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांसमोर धनगर समाजाच्या मागण्या मांडल्या.
नवी दिल्ली येथे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँगेसचे शरदराव पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार इत्यादी नेत्यांच्या भेटी घेऊन धनगर समाजाच्या राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली. याशिष्टमंडळामध्ये धनगर समाजाचे नेते अॅड. दिलीप एडतकर यांच्यासह नांदेड येथील यशपाल भिंगे, आदित्य फत्तेपूरकर (पंढरपूर), पुरुषोत्तम डाखोरे, रमेश पाटील (नागपूर), तसेच अमरावती येथील रमेशराव ढवळे, ज्ञानेश्वरराव ढोमणे, मनोज कचरे, प्रवीण मनोहर, अक्षय एडतकर, दर्यापूर येथून साहेबराव भदे व सदानंद नागे, बारामतीहून डॉ. शिवाजीराव देवकाते, पुणे येथून शंकरराव कोळेकर व तुषार रुपनर, तसेच मुखेडहून राजू पाटील सुरनर व इतर समाज बांधव उपस्थित होते. शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा यशस्वीरित्या पार पडला.
—