Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रबटर चिकन मध्ये सापडले कॉक्रोजनवी मुंबई उलवे येथील महाराजा हॉटेलचा प्रताप

बटर चिकन मध्ये सापडले कॉक्रोजनवी मुंबई उलवे येथील महाराजा हॉटेलचा प्रताप

प्रतिनिधी : महाराजा हॉटेल,सेक्टर,८ उलवे येथे जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला मांसाहारी जेवण मागवल्यानंतर बटर चिकन मध्ये खाताना कॉक्रोज सापडले,त्यामुळे एकच खळबळ माजली,ग्राहकाने याबद्दल विचारणा केली असता तेथील हॉटेल व्यवसायिकांनी त्या ग्राहकालाच दमदाटी करून पळवून लावले. याबाबत नवी मुंबई मध्ये ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका व सिडको अंतर्गत येत असलेल्या आरोग्य विभागाचे आणि अन्न व औषध प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सिद्ध होत आहे. संबंधित हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी संबंधित ग्राहकाने देखील केली असून याबाबत संबंधित विभाग कोणती कारवाई करणार की डोळे झाक करून सोडून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments