प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ आणि ८ जुलैला राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कोणत्या जिल्ह्यांत जाणार आहेत, हे उघड झाले नसले तरी त्यांचा हा दौरा निश्चित मानला जात आहे. लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे.गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक पार पडली होती. या बैठकीत लोकसभा निकालाचा आढावा घेऊन मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल, याबाबतचा अहवाल देण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला होता.
उद्धव ठाकरे ७ जुलै पासून राज्याच्या दौऱ्यावर
RELATED ARTICLES