मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या-येण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी. असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. मी खर्च तयार करायला तयार आहे. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं, त्यांच्या सर्व खर्च मी करतो, त्यांच्या हॉटेलचा खर्छ करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं म्हणतत्यांनी यावेळी निशाणाही साधला आहे.
मविआच्या जागावाटपावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अद्याप संभ्रम कायम आहे. यावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीला प्रश्न विचारता मग महायुतीचे काय बरं चाललंय का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मविआमध्ये आमचं सगळं बरं सुरू आहे. जागावाटपाबाबत भांडणं नाहीत, थोडीशी खेचाखेच आहे. जागावाटपावर थोडी खेचाखेच होतेच, भाजपसोबत आमची युती होती, तेव्हा सुद्धा खेचाखेच व्हायची, असंही ठाकरे म्हणाले.
भष्ट्राचाऱ्यांसोबत केलेली युती नैसर्गिक कशी?
निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यामुळे केजरीवालांना अटक करण्यात आली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भष्ट्राचाऱ्यांना सोबत घेऊन केलेली युती नैसर्गिक कशी, भ्रष्ट्राचार तुमच्यात नैसर्गिक आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून पेच नाही. जागावाटपाबाबत खेचाखेच सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये आमची बोलणी झालेली आहेत. अंतिम निर्णय लवकरच होईल, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो : उद्धव ठाकरे
RELATED ARTICLES