Sunday, December 15, 2024
घरमनोरंजन'आई कुठे काय...'मधील अभिनेता झी मराठीच्या मालिकेत

‘आई कुठे काय…’मधील अभिनेता झी मराठीच्या मालिकेत

Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावर मागील काही वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता मोठी घडामोड घडली आहे. या मालिकेतील अभिनेता आता ‘झी मराठी’वर झळकणार आहे.

Aai Kuthe Kay Karte :   छोट्या पडद्यावर टीआरपीची स्पर्धा जोर पकडू लागली आहे. मराठी वाहिन्यांमध्ये ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा (Star Pravah) दबदबा कायम असून ‘झी मराठी’कडून (Zee Marathi) आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. छोट्या पडद्यावर मागील काही वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या’आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेत आता मोठी घडामोड घडली आहे. या मालिकेतील अभिनेता आता ‘झी मराठी’वर झळकणार आहे.


‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. या मालिकेतील कलाकार अद्वैत कडणे हा आता झी मराठीवर दिसणार आहे. अद्वैतने आई कुठे काय करते या मालिकेत ईशाच्या पहिल्या प्रियकराची भूमिका साकारली. या व्यक्तीरेखेतून त्याने लोकप्रियता मिळवली. आता अद्वैत कडणे हा ‘झी मराठी’वर झळकणार आहे.


कोणत्या मालिकेत दिसणार अद्वैत?

अद्वैत कडणे हा झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत अद्वैत हा  लीलाची बहीण रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्वैतच्या या व्यक्तीरेखेचे नाव विक्रांत असणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments