प्रतिनिधी : सध्याची राजकीय परिस्थिती बघता महाविकास आघाडी मध्येच विरोधी सूर दिसून येत आहे. एकाच मतदार संघातून आप-आपले उमेदवार उभे करण्याची स्पर्धाच ह्या पक्षांमध्ये लागली आहे. शिवसेना उबाठा ने आधीच काँग्रेस ला विश्वासात न घेता दक्षिण मध्य मुंबई मतदार संघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. या वरून असे लक्षात येते की या आघाडीत कुठला ही समन्वय नाही व विकासाच्या मुद्द्यावर कुठले ही धोरण नाही. यांच्या अंतर्गत वादावादी चा परिणाम निश्चितच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्याऱ्या धारावी बचाओ आंदोलनावर दिसत आहे.श्रीमती दिव्या ढोले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा धारावी निवडणूक प्रमुख यांनी आरोप केला आहे.
काँग्रेस पक्ष व शिवसेना उबाठा यांची आघाडी महाराष्ट्राच्या व मुंबईच्या विकासासाठी झाली नसून ती फक्त आपला राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी झाली आहे. विकासाचं कुठलही धोरण या पक्षांकडे नसल्यामुळे ही आघाडी धारावीकरांना कितपत न्याय देऊ शकेल व धारावीच्या विकासासाठी ठोस पाऊले उचलेल ह्या बाबत शंकाच आहे. धारावी बचाओ आंदोलन ज्याचे मुख्य घटक शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्ष आहेत ह्याची स्थापनाच मुळी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करून विरोधासाठी विरोध करणे या साठी झाली आहे आणि जे कोणी धारावीच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत त्यांचे ही पाय मागे ओढण्याचे काम या आंदोलना मार्फत सराईत पणे केले जात आहे.
तात्पर्य मुंबईकरांना/धारावीकरांना आवाहन करण्यात येते की या धारावी बचाओ आंदोलनावर विश्वास न ठेवता, धारावीकरांच्या विकासासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा द्यावा व विकास विरोधी भूमिका घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे.असे शेवटी श्रीमती दिव्या ढोले,
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य
भाजपा धारावी निवडणूक प्रमुख यांनी म्हटले आहे.