Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात तिरंगा ध्वज बाबत काही भगव्याधारी प्रशासनाकडे चौकशीची मागणी…

साताऱ्यात तिरंगा ध्वज बाबत काही भगव्याधारी प्रशासनाकडे चौकशीची मागणी…

सातारा(अजित जगताप) : सारे जहाँ से अच्छा.. हिंदुस्तान हमारा.. असं वर्णन केलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. आज सर्वत्र तिरंगा ध्वज फडकवून देश अभिमान दाखवला जात आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील तांदुळवाडी ता. कोरेगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान करून भगवा ध्वज फडकवण्यात आला. या विरोधात जागरूक नागरिक आंदोलन करत आहेत. त्याची दखल घेत नसल्यामुळे तिरंगा ध्वजाच्या अवमनाबाबत तातडीने चौकशीची मागणी काही भगव्याधारी प्रशासनाकडे केली जात आहे. अशी चर्चा रंगू लागलेली आहे . याबाबत माहिती अशी की, भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२४ रोजी तांदुळवाडी ता. कोरेगाव या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. असे असताना कोरेगावचे भाजपचे विद्यमान आमदार यांची पत्नी यांनी चक्क तिरंगा ध्वजाला दुय्यम स्थान देऊन व अपमान करून प्रथम जाहीरच्या भगवा ध्वज फडकवला. सदरच्या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी शासकीय कर्मचारी यांना याबाबत यापूर्वी सूचना दिली होती. त्यामुळे ते सदर घटनेमुळे उपस्थित राहिले नाहीत. अशी त्यांनी कबुली दिली. तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच व इतर सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याबाबत तातडीने सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी तसेच २८ फेब्रुवारी रोजी याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी. असे निवेदन दिले होते. त्यानंतर ते दिनांक १० जून रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. जगात भगवा सर्वश्रेष्ठ आहे. परंतु भारत देशाचा विचार केला तर तिरंगा ध्वज हा सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ ध्वज आहे. दुसरी बाजू म्हणजे तांदुळवाडी गावामध्ये समाज मंदिर बांधण्यात आले होते. हे समाज मंदिर कर्तव्यदक्ष व कर्तबगार आमदार शंकरराव जगताप यांच्या कारकिर्दीमध्ये झाले असल्यामुळे या समाज मंदिराचा वापर होऊ नये. यासाठी प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला. या समाज मंदिराचा वापर होत नसल्याने शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु, भगव्या विचाराने ग्रासलेल्या काही लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचाऱ्यांमुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या कोणत्याही धार्मिक समूहाला विरोध नसून आम्ही सर्वप्रथम संविधानाला मान्यता देतो. कारण संविधानामुळेच लोकप्रतिनिधींना व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिकार मिळालेला आहे. हा कुठल्याही धार्मिक ध्वजामुळे मिळालेला नाही. याची आता आठवण करून द्यावी लागत आहे. सदर प्रकरणाबाबत फारशी दखल घेतली जात नसल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव व त्यांचे सहकारी निषेध व्यक्त करीत आहेत. वास्तविक पाहता मानवता दृष्टिकोन ठेवून अनेक भगवेधारी मंडळी माणुसकी जपत असल्यामुळेच भारत देश जगात अखंड राहिलेला आहे. त्याला गालबोट लावण्याचे कृत्य काही अंधभक्त व स्वतःच्या स्वार्थासाठी भगव्याचा वापर करणाऱ्या प्रवृत्ती सातारा जिल्ह्यात वाढू लागल्यामुळेच आम्ही आंदोलन करत आहेत. यामागे कुठल्याही धार्मिक व ध्वजाचा अवमान करणे असं आमच्या रक्तात नाही. कारण, आम्ही संविधान मानतो. संविधानानेच आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे त्याच पद्धतीने सर्व धर्माचे रक्षण करण्याचे अधिकार दिलेला आहे भगव्याचे रक्षण व्हावे म्हणून हे आमचे आंदोलन आहे. तिरंग्याचा मान राखला जावा. यासाठीच आमचे आंदोलन असल्याची माहिती आंदोलक संदीप जाधव तसेच लढाऊ पॅंथर विश्वास मोरे, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर, प्रा. विलास वहागावकर, दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, एडवोकेट विजयानंद कांबळे, रमेश उबाळे, वैभव गायकवाड, शुभम बल्लाळ, पृथ्वी राजे निंबाळकर, अजित वाघमारे आदी मंडळींनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अन्यथा आम्हीही आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments