Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रमाफी मागावी नाहीतर , माजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या विरोधात तीव्र...

माफी मागावी नाहीतर , माजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार – वर्षा गायकवाड यांचा इशारा

.

प्रतिनिधी (रमेश औताडे): माजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ” मुंबईतील झोपडपट्टी मिठागरांच्या जागेवर शिफ्ट करावी ” हे वक्तव्य त्वरित मागे घ्यावे , नाहीतर मुंबई काँगेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुंबई काँगेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुंबई काँगेस कार्यालयात पत्रकार परिषदेत दिला.

मुंबई ही गोरगरीब, कष्टकरी माणसामुळे निर्माण झाली आहे. श्रीमंतांसाठी रातोरात विमानतळाचा निर्णय घेतला जातो मात्र झोपडपट्टी पुनर्वसन, त्यांचे आरोग्य, शिक्षण याबाबत भाजपा काही बोलत नाही.मात्र आंतरराष्ट्रीय नेते जेव्हा भारतात येतात तेव्हा रस्त्यालगतची झोपडपट्टी पांढरे पडदे लावून झाकली जाते. मोठमोठे स्वागत फलक लावून झोपड्या झाकल्या जातात. त्यामुळे पियूष गोयल यांनी लवकरात लवकर माफी मागावी व केलेले विधान मागे घ्यावे नाहीतर मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा झोपडपट्टी सेल चे मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी दिला.

काँग्रेस ने १८२३ कोटी रुपये कर भरला नाही त्याबद्दल काँग्रेसची बँक खाती सिल केली मात्र भाजपाने ८ हजार २०० कोटींचे निवडणूक रोखे घोटाळा केला आहे. ४ हजार ६०० कोटीचा कर बुडवला आहे त्याची काँग्रेस श्रेष्ठी सखोल चौकशी करत आहोत लवकरच भाजपाचा पर्दा फास केला जाईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

काही वृत्तपत्रात पियूष गोयल यांनी सकारात्मक प्रसिद्धी दिली जाते. आचारसंहितेचा भंग करत असताना निवडणूक काय करत आहे असेही गायकवाड म्हणाल्या.

यावेळी प्रमुख प्रवक्ते युवराज मोहिते, झोपडपट्टी सेल चे मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस,राष्ट्रीय प्रवक्ते ऍड. म्याथू अँथनी उपस्थित होते.

.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments