Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुंबईकरांनो सावधान; पुढील ४८ तासात मुसळधार पाऊसाची शक्यता

मुंबईकरांनो सावधान; पुढील ४८ तासात मुसळधार पाऊसाची शक्यता

प्रतिनिधी  : महाराष्ट्रात पुढील ४८ तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज
पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सरी पाहायला मिळाल्या आहेत. नागरिकांचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत. सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
आज ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments