प्रतिनिधी : महायुतीच्या जागावाटपातील रिपाइं ची नाराजी दूर; देशात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी रिपाइं महायुतीचा प्रचार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई 30 – केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लीकन पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .महायुती च्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा आणि सन्मान दिला नसल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यावर ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. देशात पुन्हा मोदी सरकार निवडून आणण्यासाठी रिपाइं ची साथ महत्वाची आहे. त्यामुळे या दरम्यान झालेले दुर्लक्ष पुन्हा होणार नाही असे सांगत रिपाइं च्या सर्व मगण्या मंजूर करून रिपाइं ला महायुती मध्ये सन्मानाने सोबत ठेवणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ना.रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आता मागचे विसरून नव्या दमाने महायुती च्या प्रचाराला रिपाइं लागणार असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.यावेळी ना. रामदास आठवलेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेल्या रिपाइं च्या शिष्टमंडळात रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; राज्य युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुरेश बार्शिंग; एम एस नंदा; कांतिकुमार जैन आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिर्डी आणि सोलापूर या जागा आम्हाला मिळायला हव्यात होता मात्र आता आम्हाला केंद्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद राज्यात एक मंत्रिपद एक विधान परिषद सदस्य आणि विधानसभा निवडणुकीत रिपाइं का किमान 10 जागा देण्याची मागणी असून त्या सोबत राज्य सरकार च्या राज्य मंत्री दर्जा असलेल्या दोन महमंडळ अध्यक्ष पदे; उपाध्यक्ष पदे; 50 शासकीय महामंडळ सदस्य संचालक पदे तसेच जिल्हा नियोजन समिती ची सदस्य पदे रिपाइं कार्यकर्त्यांना द्यावित या मागण्यांचे निवेदन रिपाइं तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.यावर झालेल्या चर्चेत फडणवीस यांनी रिपाइं च्या सर्व मागण्यांची पूर्तता करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.