प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकत इंडिया महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवनिर्वाचित खासदार वर्षाताई गायकवाड यांनी मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली, यावेळी वर्षाताई यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी माजी मंत्री ॲड. अनिल परब जी, डॉ. महेश पेडणेकर जी, संदीप नाईक जी आणि विजू शिंदे जी आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तर मध्य मुंबईतून वर्षाताई गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या या बहिणीला वर्षाताई ला खासदार बनवून दिल्ली ला पाठवणारंच हा दिलेला शब्द खरा ठरवला. यावेळी वर्षाताई गायकवाड यांनी
हातात धगधगती मशाल, साथीला तुतारी,
लोकशाहीचा विजय झाला सुरू जनसत्तेची तयारी
असे सांगितले.यावेळी त्यांनी अन्यायाविरुद्ध न्यायाच्या या रणसंग्रामात विजयश्री खेचून आणण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले. याबद्दल मी उद्धव ठाकरे साहेबांचे आणि शिवसैनिकांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मात्र मी सर्वांची कायम कृतज्ञ राहीन.असे शेवटी नवनिर्वाचित खासदार वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.