प्रतिनिधी : मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज दिनांक ०५ जून रोजी कोकण भवन _ सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे हजारो शिक्षक / शिक्षिका मतदार बंधू भगिणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते . १८ वर्ष शिक्षक आमदार राहिलेले मा. कपील पाटील तसेच शिक्षक भारतीचे प्रमुख मार्गदर्शक तथा अध्यक्ष अशोक बेलसरे सर यांनी स्वतः उपस्थित राहून सुभाष मोरे सरांना शुभाशिर्वाद दिले.
शिक्षक भारती संघटनेचे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयाची नांदी आजच घुमली असा उत्साह शिक्षकांमध्ये होता . त्याचे कारण आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कामांबद्दल आज काही शिक्षकांनीही दिलेल्या प्रतिक्रिया सुभाष मोरे सरांच्या कार्याविषयी बरेच काही सांगून जात होत्या.
अर्ज दाखल करताना शिक्षक भारतीचे प्रमुख कपील पाटील,उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.