सातारा (अजित जगताप) : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निकालाने कभी खुशी… कभी गम….. साताऱ्यात दिसून आले . महायुतीचे उमेदवार श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे शिल्पकार पडद्यामागे आहेत. पण, खऱ्या अर्थाने रिपाईच्या तुतारीने म्हणजेच संजय गाडे यांच्या उमेदवारीने श्री छ खा उदयनराजे यांच्या कपाळी गुलाल लागला. राजेंची मोहीम फत्ते करणाऱ्या या भूमिकेचे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे
सातारा लोकसभेच्या निवडणुकीत मतमोजणी केंद्रामध्ये पहिल्या फेऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे सातारा शहरासोबतच परिसरात चांगलीच धाकधुकी वाढली होती. सातारा शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने लागू केलेले १४४ कलम तसेच मिरवणुकीवर बंदी घातली होती. चौका चौकात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे या परिसरामध्ये छावणीचे स्वरूप असले तरी दुपारपर्यंत रस्त्यावर समर्थक व कार्यकर्ते दिसत नव्हते. मात्र, दुपारनंतर महायुतीचे श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांनी तेराव्या फेरीत १०२५ मताची आघाडी घेतली .हे जाहीर होताच अनेक सार्वजनिक ठिकाणी समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.ही गर्दी आणि आघाडी जसजशी वाढेल तसतसे सातारच्या पोलीस यंत्रणा सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आले .पोलिसांना अक्षरशः बग्याची भूमिका घ्यावी लागली . चार चाकी व दूध चाकी च्या टपावर बसून तर काही जण जयघोष करत रस्त्यातच गुलाल उधळत होते. एवढेच नव्हे तर पवई नाका या ठिकाणी जेसीबी बोलून रस्ता अडवून गुलालाची उधळण केली जात होती. सोबत डी.जे चा दणदणाट आवाज सर्वत्र चांगलाच घुमू लागला होता.
श्री छ खा भोसले समर्थकांनी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. त्यावेळेला श्री छ खा उदयनराजे भोसले यांनी सुद्धा समर्थकांना चांगलीच दाद दिली. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीला मतमोजणीत आघाडी मिळण्यापूर्वी भाजपचे कार्यालयामध्ये शांतता पसरली होती. तर दुसऱ्या बाजूला उमेदवारांचे प्रतिनिधी व श्री छ खा भोसले यांचे कट्टर समर्थक श्री दत्ता बनकर व त्यांचे सहकारी हे मतमोजणी केंद्रात विजयमुद्रेने सर्वत्र वावरत होते. अखेर मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये फेऱ्या वाढत असताना श्री. छ. खा. भोसले यांची मताची आघाडी सुद्धा वाढू लागली .
रिपाई गवई गटाचे मतदान यंत्रणेमध्ये नऊ क्रमांकावर असलेले उमेदवार संजय कोंडीबा गाडे यांना पहिल्या फेरीत १८४५ मते तर श्री छ खा उदयनराजे भोसले यांना सत्तावीस हजार पाचशे छप्पन व शशिकांत शिंदे यांना २७,९०७ हजार मत पडली होती. त्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये उदयनराजे व संजय गाडे यांचे मताधिक्य वाढत असल्याने उदयनराजे भोसले यांना निवडणूक सोपी जाऊ लागली. शेवटच्या २३ व्या मतमोजणी फेरीत संजय गाडे यांना सदोतीस हजार ३५ व श्री छ खा भोसले यांना पाच लाख ६५ हजार २९२तर शशिकांत शिंदे यांना पाच लाख छत्तीस हजार ४७५ अशी मते मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या चिन्ह हे तुतारी फुंकणारा माणूस तर रिपाईचे गवई गटाचे उमेदवार संजय गाडे यांनी सुद्धा तुतारी हे चिन्ह घेतले होते. यामुळे तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढणारे संजय गाडे यांना तब्बल ३७ हजार ३५ मते मिळाली. तर महा विकास आघाडीच्या उमेदवाराचा सुमारे ३२,७७१ मताने पराभव झाला. महा युतीच्या उमेदवाराला हस्ते पर हस्ते मदत झाल्यामुळेच त्यांचा विजय सोफा झाला. कारण, रिपाई गवई गट पुरस्कृत उमेदवार संजय गाडे यांची उमेदवारी नसती तर कदाचित वेगळा निकाल लागला असता अशी आता चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, निवडणूक मतमोजणीनंतर विजय झालेले उमेदवार श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्याकडे विजयाचे प्रमाणपत्र सातारा जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी, निवडणूक निरीक्षक सुरेंद्र धिरण, आर अर्जुन अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे महायुतीचे उमेदवार प्रतिनिधी दत्ता बनकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी श्री. छ. खा. भोसले व सुनील काटकर चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच रिपाई गवई गटाचे उमेदवार संजय गाडे यांनी श्री छ खा भोसले यांच्या कपाळावर गुलाल लावून त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. अनेक अपक्ष उमेदवारांनी ही मतं घेतली असली तरी रिपाई गवई गटाचे श्री गाडे यांच्या तुतारीने खऱ्या अर्थाने महायुतीच्या उमेदवाराला उमेदवारांना यश मिळाले यामुळे आगामी निवडणुकीत साताऱ्यात रिपाई गवई गटाचे वजन चांगलेच वाढले असल्याचे राजकीय निरीक्षकांनी ही मान्य केले आहे अशी माहिती रिपाई गवई गटाचे महासचिव चंद्रकांत कांबळे ,विशाल गायकवाड यांनी दिली आहे .
चौकट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये अपक्ष तुतारी चिन्हाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता याबाबत तक्रार केली असून लवकरच निर्णय होईल असे सांगितले होते पण कोणताही निर्णय न झाल्यामुळे अखेर तुतारीचा तुतारीनेच घात केल्याहे सिद्ध झाले.