Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने खा. अंनत गीते यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्यावतीने मा. खासदार अंनत गीते यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मोगरे शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना लागणारी वस्तू वह्या,पेन्सिल,पेन, खोडलबर,पट्टी,पाऊच, विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी चटई , इत्यादी वस्तू मा.खासदार अनंत गीते, तसेच रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम व महाड तालुका संपर्कप्रमुख नागेंद्रजी राठोड यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर,सचिव संदीप चांदीवडे,संचालक दौलत बेल्हेकर,कार्यालय प्रमुख वसंत घडशी,सौ मेघा सावंत ,वनिता वायकर,राजेंद्र पेडणेकर, चंद्रकांत धोंडगे , तसेच राजापुर तालुक्यातील माझी विध्यार्थी सुनील साखरकर, विलास साखरकर,संजय जोशी, यांच्या कडे हे साहित्य देण्यात आले यावेळी आदी मान्यवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments