सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने पोलीस यंत्रणेवर आहे. त्यामुळे पोलीस कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत.साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही बंदोबस्ताची जबाबदारी सोबतच माणुसकीचे हे कर्तव्य तीन पोलीस जवानांनी पार पाडल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
४५ सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली. त्यानंतर मंगळवार दिनांक ४ जून रोजी शासकीय गोदाम, सातारा औद्योगिक वसाहत, देगाव रोड सातारा या ठिकाणी मतमोजणी होत आहे. त्या अनुषंगाने सातारा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. या बंदोबस्तासाठी दाखल झालेले पोलीस जवान अमित भरत माने, रोहित विश्वासराव पवार व जयवंत यशवंत गोसावी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठिकाणी सलग दोन दिवस बंदोबस्त करण्यासाठी निघाले.
याचवेळी देगाव रस्त्यावर एका ठिकाणी रक्तदान शिबिराचा नामफलक पाहून या तिन्ही पोलीस जवानांनी त्वरित रक्तदान शिबिरात जाऊन रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. पोलीस कर्तव्य म्हणजे लोकांचे रक्षण करणे. त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे. सध्या सातारा जिल्ह्यात रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक रुग्णांना इच्छुक रक्तासाठी पायपीट करावी लागते. काहींना रक्त देतं का कोणी रक्त… असे म्हणण्याची पाळी आली.
समाजात अनेक धडधाकट लोक स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात. परंतु, कधीही अशा रक्तदान शिबिरात जाऊन त्यांनी रक्तदान केले .असं कधी दिसून येत नाही. याला काही अपवाद असू शकतात. त्यांची संख्या फार कमी आहे. परंतु या तीन पोलीस जवानांनी स्वतः रक्तदान शिबिराच्या स्थळी जाऊन रक्तदान केलेले आहे. या पोलीस जवानांना सामाजिक कार्यकर्त्या व भारत जनरिक मेडिकल स्टोरच्या पल्लवी माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार अजित जगताप व विशाल कदम उपस्थित होते.
बालाजी ब्लड बँकेच्या वतीने त्यांनी रक्तदान करून मानवता जपली आहे खरं म्हणजे पोलीस बंदोबस्तासाठी अनेक पोलीस अधिकारी व पोलीस जवान हे ऊन- वादळ- वारा- पावसाची तमा न बाळगता औद्योगिक वसाहती मधील गोदामामध्ये बंदोबस्त करीत आहेत.सकाळी सात वाजल्यापासून पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत तर मंगळवार दिनांक ४ जून रोजी पहाटे पाच वाजता पोलीस आपल्याला नेमलेल्या ठिकाणी जाऊन बंदोबस्त करणार आहेत.
साताऱ्यात बंदोबस्ताच्या जबाबदारी सोबतच माणुसकीचे कर्तव्य
RELATED ARTICLES