Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रदुधवाल्या चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार, 3 महिन्यात वाटले 226 कोटी

दुधवाल्या चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार, 3 महिन्यात वाटले 226 कोटी

पुणे : राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी  महत्त्वाचा निर्णय घेतला. दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधासाठी सरकार शेतकऱ्यांना 5 रुपयांचं अनुदान देणार आहे. त्यामुळे पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयांचा दर मिळणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असून या निर्णयाची अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. देशातील लोकसभा निवडणुकांचा अंतिम व शेटवचा टप्पा उद्या 1 जून रोजी पार पडत आहे. तर, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची सांगता 20 मे रोजी 5 टप्प्यात झाली आहे. त्यानंतर, आता शेतकऱ्यांना दुधाच्या अनुदानाचे पैस मिळण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. मागील दोन महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप करण्यात आलं आहे. 

बाजारात दुध उत्पादक कंपन्यांच्या दुध पिशव्यांचे दर वाढले असून शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यासाठी, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी आंदोलनेही केली आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला जादा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होती होती. या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारनं जाहीर केलंलं हे 5 रुपयांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नव्हतं. त्यामुळे, अनेक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आलं. अनेक गावात शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला होता. मात्र, आता शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळत आहे. 

शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण झाल्याने दुध विक्रेत्यांमधे समाधान आहे, गेल्या दोन महिन्यांत 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती 5 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता, सरकारने पारदर्शकपणे पहिल्यांदाच ही योजना राबवल्यामुळे चितळे दूध, थोरात दूध,ऊर्जा दूध आणि इतर दुध संघांनी एकत्र येऊन या विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे मंत्रालयात जाऊन आभार मानले, तसेच त्यांचा सत्कारही केला. 
योजनेत कुठलीही अनियमितता नाही
सरकारने जनावरांसाठी लागू केलेल्या एअर टॅग  पद्धतीमुळे या अनुदान योजनेत कोणतीही अनियमितता आणि अपहार झाला नसल्याचा दुध संघ आणि तुकाराम मुंढे यांचा दावा आहे. आपल्या धडाकेबाजी कामगिरीने सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड येथील दमदार कामगिरीतून जनसामान्यांत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच, मुंडेंच्या बदलीनंतर अनेकांनी रस्त्यावर उतरुन सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. आपल्या कामाच्या स्टाईलने नेहमीच वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंढे यांचा आज दुध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आल्याने, तुकाराम मुंडे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये व ग्रामीण भागात चर्चेत आहेत.  

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments