मुंबई (शांताराम गुडेकर ) : लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांना गुरुवार दि. ३० मे २०२४ रोजी जनादेश टिव्ही न्युजच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या निमत्ताने राम गणेश गडकरी रंगायतन,ठाणे येथे प्रमुख पाहुणे श्री. मनोज शिवाजी सानप (ठाणे जिल्हा – माहिती अधिकारी )यांच्या शुभ हस्ते “कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ “या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर दा.कृ. सोमण (पंचांगकर्ता /खागोल अभ्यासक ), समाजरत्न डॉ. शेठ नानाजीभाई खिमजिभाई ठक्कर(ठाणावाला ), कैलास पवार (ठाणे जिल्हा – शल्य चिकित्सक ),अभिनेता अनिकेत केळकर,संपादक – मंगेश प्रभूळकर, कार्य. संपादक -अश्विनी भालेराव, ऍड. सौ. कदम, कु. डॉ.ढवळ,निर्भय पत्रकार संघटना पदाधिकारी, सदस्य, सभासद उपस्थित होते.
जनादेश टिव्ही न्युजच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था, निर्मल व हरित गावे, ग्रामपंचायत, सामाजिक सांस्कृतिक मंडळे, संस्था / संघटना, पतसंस्था, बँका व सहकार क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचा खास पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला.शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, राजकारण, वैद्यकीय, वकिली, अभियांत्रिकी इत्यादी विविध क्षेत्रात कार्यक्षेत कर्तृत्ववान गुणीजनांचा या राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह,खास मानपत्र, आणि तुळशीरोप असे होते.नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती. याशिवाय गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे मूळ उद्देश आहे.गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित झाल्याबद्दल लांजा तालुक्यातील अनेक मान्यवर, सामाजिक संस्था, समाज मंडळ, कुणबी समाज शाखा, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, करंबळे परिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित
RELATED ARTICLES