Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात सामान्य उमेदवार मतमोजणी प्रक्रियेसाठी स्वतः जातीने हजर

साताऱ्यात सामान्य उमेदवार मतमोजणी प्रक्रियेसाठी स्वतः जातीने हजर



सातारा(अजित जगताप) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून राजकारणातून समाजकारण केले. पण अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे पैशाचा खेळ झालेला आहे. हे आता कुणीही नाकारू शकत नाही. अशा वेळेला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काही सामान्य उमेदवार रिंगणात होते. आता या सामान्य उमेदवारांची लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते स्वतः जातीने हजर होते तर काहींनी प्रतिनिधी पाठवले. याबाबत माहिती अशी की, सातारा लोकसभेची निवडणूक सात मे रोजी पार पडली. या निवडणुकीच्या अनुषंगाने विकास कामांऐवजी व्यक्तिगत हेवेदावे तसेच भ्रष्टाचाराचा आरोप केला. काहींनी स्वतःच्या व्यक्तिगत प्रयत्न पेक्षा नेत्यांच्या नावे मते मागितली. आणि मतदारांनी सुद्धा आपल्याला अपेक्षित असणाऱ्या विचारालाच मतदान करण्याचा निर्णय घेतला. एकूणच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सोळा उमेदवारांचे भाग्य बटन दाबून उजळणार आहे. एकूण ६३.१६ टक्के एवढे मतदान झाले. उर्वरित मतदारांनी ईव्हीएम मशीन पर्यंत न जाता मतदान केंद्रापासून फरकत घेतलेली आहे.
आता मतमोजणीला सहा दिवस बाकी असतानाच सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना निमंत्रित करून बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्वसामान्य उमेदवार उपस्थित होते. मात्र, प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते .
खरं म्हणजे महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत झाली आहे. उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीसाठी लागणारे पोस्टर ,बॅनर व जाहीरनामा सर्व पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील नेते सुद्धा प्रचारासाठी आले होते. या निमित्त का होईना पण सातारा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यापूर्वी उमेदवारांना मतदारसंघात भेट देण्याची संधी मिळाली. तसेच अनेक मतदारांना सुद्धा उमेदवाराचे दर्शन झाले.
सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडून बावीस दिवस झाले आहेत. काही उमेदवार व त्यांच्या प्रचाराकांचा थकवा दूर झाला असला तरी या निवडणुकीत प्रचाराचा अति ताण पडल्यामुळे काही कार्यकर्त्यांना दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. काही कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने मतमोजणी प्रक्रियेत सामील झालेले आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढत असून प्रत्येक जण पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दोन वेळा अवकाळी पावसामुळे अनेकांच्या शेती व घराचे नुकसान झाले पण, काही उमेदवारांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला सवड मिळाली नाही. असे आता काही मतदार सांगू लागलेले आहेत. कोण विजय होणार? हा भाग गौण असला तरी सामान्य लोकांनी या निवडणुकीत उमेदवारी दाखल करून खऱ्या अर्थाने १६ हा आकडा धोक्याचा असल्याचे संकेत दिले आहेत. कारण, निवडणूक झाली की उमेदवार त्या राजकीय पक्षाची भूमिका मांडत असतो .आता तर महाविकास व महायुती अशी लढत असल्यामुळे विजय आणि पराभव याचे अनेक जण विश्लेषण करतील . पण, या विश्लेषणामध्ये नेमकं कोण उमेदवार विजयी होतील? याची आता मानसिकता सर्वांनीच केलेली आहे. त्यात आता कुणालाही बदल करता येणार नाही. हे मात्र निश्चित…

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments