Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर नियुक्ती…

आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर नियुक्ती…

सातारा(अजित जगताप) :  सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती व बदल्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या आवारात मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांनी गर्दी केली . या शिक्षकांनी नियुक्त बदलीसाठी दिलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करूनच त्यांना पत्र दिले जाईल अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांनी दिली आहे

एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता असल्यामुळे सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची शासकीय सेवेतील बदली व नियुक्ती दिली गेली नाही. आता प्राथमिक शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसाचा अवधी असतानाच सातारा जिल्हा परिषदेने आंतरजिल्हा व जिल्हातर्गंत बदलीप्राप्त शिक्षकांना शाळा व नियुक्ती आदेश देण्यासाठी काहींनी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, दिव्यांग यासारख्या आरक्षणातील शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी करुनच इतर जिह्यातील बदली प्राप्त शिक्षकांना सातारा जिह्यात सोडण्यात आले नव्हते. गेल्या सहा दिवसांपासून इतर जिह्यातून अशा प्रवर्गातील शिक्षकांना सोडण्यात येत असून त्यांना नियुक्ती आदेश देण्यासाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरु केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरु होण्यापूर्वी त्यांना संबंधित शाळेत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे . ज्ञानदान करण्यासाठी अनेक शिक्षक इच्छुक असून काहींनी चक्क दुर्गम भागात सुद्धा काम करण्याची तयारी ठेवलेली आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांनी दिली आहे. दुर्गम भागातील दोन विद्यार्थी असलेल्या शाळेत पट वाढवण्याची तयारी अशा शिक्षकांनी केली आहे त्यांचे मनापासून कौतुक होत आहे.

सातारा जिह्यातील आतंरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली प्राप्त काही प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्याकडे सातारा जिह्यातील शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी आचारसंहितेत बदल्यांची प्रक्रिया अडकू नये. म्हणून कार्यवाही पूर्ण केली . त्यावेळी शिक्षकांना नियुक्त्याही दिल्या गेल्या आहेत. मात्र, सोमवारी सकाळी ११ पासून सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरात शिक्षक मोठया प्रमाणात दिसत होते. तेव्हा त्यांना विचारले असता आम्ही आंतरजिल्हा प्राथमिक शिक्षक बदली आदेश घेण्यासाठी आलेलो आहोत. असे सांगण्यात आले. याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांनी सांगितले की, इतर जिह्यातून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत खेळाडू, दिव्यांग या प्रवर्गातील हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना शाळा देण्यासाठी आपण जो कार्यक्रम तयार केला आहे त्यानुसार कार्यवाही करुन शाळा सुरु होण्यापूर्वी सर्वच शिक्षकांना शाळा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments