Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रसातारा जि प. कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिका नसल्याने पर्याय केला खुला…

सातारा जि प. कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिका नसल्याने पर्याय केला खुला…


सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले आरोग्य सहाय्यक श्री प्रल्हाद पवार यांचे मूळ सेवा पुस्तक जिल्हा परिषदेच्या अभिलेख वर्गीकरण मध्ये सापडत नसल्याने त्यांना शासकीय देयक मिळण्यास विलंब लागत आहेत. आता याबाबत सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश घुले यांच्या प्रयत्नाने सकारात्मक भूमिका घेऊन पर्याय खुला केला आहे . आता तब्बल दहा वर्षांनी सातारा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व साथरोग शाखा व आरोग्य प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आरोग्य सहाय्यक पदावर श्री प्रल्हाद सर्जेराव पवार यांनी काम केले व सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवानिवृत्तीनंतर गट विमा मंजुरीचा प्रस्ताव मंजुरी झाला. यासाठी अर्थ विभागाने दिनांक २२ एप्रिल २०१४ रोजी त्यांचे मूळ सेवा पुस्तक आरोग्य जिल्हा परिषद सातारा कडे पाठवले होते. तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रातून हे सेवा पुस्तक पाठवल्याचे पत्र सुद्धा त्या विभागाकडून जोडण्यात आले होते.
यानंतर सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक श्री प्रल्हाद पवार यांचे मूळ सेवा पुस्तकाची मागणी केल्यानंतर सदरचे सेवा पुस्तक सर्व अभिलेखाच्या पडताळणी केल्यानंतर आढळून आले नाही. शासन वित्त विभागाकडील दिनांक २८ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार जून मध्ये सेवानिवृत्त झालेल्या एक जुलै रोजीच्या काल्पनिक वेतन वाढ मंजूर करून त्यांना अर्ज केलेले तीन वर्ष अगोदर निवृत्ती वेतन फरक व काल्पनिक वेतन वाढीचे अनुशेष देयक अदा करण्याचे आदेश आले. या देयकासाठी ते गेले आठ महिन्यापासून सातत्याने मूळ सेवा पुस्तिका मिळवण्यासाठी अर्ज करत आहेत .पण, त्यांची सेवा पुस्तिका सापडत नसल्याने त्यांची सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भटकंती सुरू झाली होती . तसेच ते आर्थिक लाभापासून वंचित राहिलेले आहेत.
गेली सहा महिने सेवानिवृत्त झालेले आरोग्य सहाय्यक हे मूळ सेवा पुस्तिका साठी अर्ज व निवेदन देत आहेत .नवलाईची गोष्ट म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी श्री पवार यांच्या चौकशी कामी कंटाळले आहेत. पण अजूनही त्यांची मूळ सेवा पुस्तिका सापडली नाही. की नेमकी कुठे गेली यासाठी आता पोलीस यंत्रणेकडे धाव घेतली जाणार आहे.
श्री पवार यांनी सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केल्या. माहितीचा अधिकार वापरला पण त्यांना दाद देण्यात आली नाही. मूळ सेवा पुस्तक सापडले नसल्याने सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक श्री पवार यांचा अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे. असं जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी यांनी १९ मार्च २०२४ रोजी श्री पवार यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्याच पद्धतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा मूळ सेवा पुस्तिका सापडत नसल्याचे लेखी कळविले आहे. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये सुधारणा होत असून गतीने काम होत असले तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच मूळ सेवा पुस्तिका मिळवण्यासाठी सातत्याने हेलपाटे मारावे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या गतिमान कारभाराबाबत आता सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. कारण, त्यांनाही एक दिवस सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. त्यावेळी त्यांची ही अवस्था अशी होऊ नये. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री घुले यांनी तातडीने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे श्री प्रल्हाद पवार यांनी आभार मानले आहेत.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments