Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशमहाराष्ट्रात महायुतीच्या 36 ते 40 जागा निवडून येतील : रामदास आठवले 

महाराष्ट्रात महायुतीच्या 36 ते 40 जागा निवडून येतील : रामदास आठवले 


प्रतिनिधी : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 6 टप्प्यात मतदान पार पडले. सध्या देशातील मतदानाचा केवळ एक टप्पा राहिला आहे. 1 जून रोजी देशात लोकसभेच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 रोजी देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान पार पडले. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी रेकॉर्ड ब्रेक सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराच धडाका लावला होता. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून येतील? याबाबत बेधडक अंदाज व्यक्त केले आहेत. 

महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे. मात्र, आम्ही देखील जोरदार लढत दिली होती. महायुतीच्या मुंबईतील 6 जागा निवडून येतील. महायुतीने सर्व जागांवर चांगले उमेदवार दिले होते. महाराष्ट्रात 36 ते 40 निवडून येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर देशात 350 ते 400 जागा निवडून येतील, असा अंदाज रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  उत्तर प्रदेशात 80 पैकी 75 जागा महायुतीच्या निवडून येतील. पीएम मोदींच्या 400 पार नारा यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. उत्तर प्रदेशात भाजपा आणि इतर मित्रपक्ष मजबूत असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. 

रामदास आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, संजय राऊतांच्या दाव्याला रामदास आठवलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास आठवले म्हणाले, नितीन गडकरींनी पाडण्यासाठी मोदी-शाहांनी नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रयत्न केले आहेत. संजय राऊत संपादक आहेत, त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. मात्र, ते गैरसमज पसरवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत.  

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments