मुंबई : पुण्यातील हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘ असल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वडेट्टीवार म्हणाले की,पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता हे समोर येत आहे.ज्या डॉक्टरांनी या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलले त्याला ससून रुग्णालयात अधीक्षक पदाची जबाबदारी द्यावी असे शिफारस पत्र अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पत्र लिहून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती.
श्री. वडेट्टीवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केलेले पत्र शेअर करत पुणे हिट अँड रन प्रकरणावरून संताप व्यक्त करत टीकास्त्र डागले आहे.
श्री. वडेट्टीवार म्हणाले की,
भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिफारस पत्र लिहून पदावर बसवण्यात येत आहे. राजकीय पाठबळ असल्यामुळेच नियम आणि कायदे धाब्यावर बसवून निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या आरोपींना वाचवण्या इतकी ह्या अधिकाऱ्यांची हिंमत होत असल्याचे वडेट्टीवार यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.