प्रतिनिधी : शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र.१२ चे माजी विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ यांचं अल्पशाः आजाराने निधन.
गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी पाच वाजता गिरगाव चंदनवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन दक्षिण मुंबई मध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमठवणार्या शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख,कार्यकुशल नेतृत्व,उत्तम आयोजन-नियोजनबद्द प्रत्येक कार्य यशस्वीपणे पार पाडणारे असे शांत,संयमी व्यक्तिमत्व,दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर चंदनवाडी हिंदू स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच शिवसेनेचा एक निष्ठावंत शिवसैनिक गेल्यामुळे शिवसेना परिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
