मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून या दिवशी होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक अन् मुंबई शिक्षक मतदार संघ येथे ही निवडणूक होणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार ३१ मे ते ७ जून अर्ज भरणे, १० जून अर्जाची पडताळणी, १२ जून अर्ज मागे घेणे, २६ जून मतदान, तर १ जुलै या दिवशी मतमोजणी होणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे या लोकप्रतिनिधींचा ६ वर्षांचा कालावधी संपणार असल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.
विधान परिषद निवडणूक २६ जूनला
RELATED ARTICLES