Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेश२५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे(प्रतिनिधी) – ठाणे जिल्ह्यात उद्या दि 20 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत
सखी मतदान केंद्रे : 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 436 (रॉयल कॉलेज), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 439 (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. 2 तळमजला), 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 199 (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन 1 रोड नं. 22 वागळे इस्टेट, ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 265 (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 152 (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर 5, ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 124 (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत.
दिव्यांग मतदान केंद्रे- 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 191 (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 326 (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे ) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 306 (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं 2 गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 283 (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 141 (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 205 (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर 11 प्लॉट नं. 9 नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत.
युवा मतदान केंद्रे – 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 196 (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं 1), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 332 (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 170 (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 353 (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं 3, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 169 (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर 7 दिवा गांव ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 28 (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments