प्रतिनिधी – महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार सांगता शोभा यात्रेत तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. ही बाईक रॅली शिवसेना भवन दादर, सायन, धारावी,माहीम येथून काढण्यात आली शोभा यात्रेची सांगता वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर साहेबांचे आशीर्वाद घेऊन संपवण्यात आली. नंतर खाडके बिल्डिंग,दादर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली होती,यावेळी मतदारांना मशाल ला मतदान करण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले व प्रचाराची सांगता करण्यात आली.
अनिल देसाई यांच्या प्रचार सांगता शोभा यात्रेत तरुणाई अवतरली
RELATED ARTICLES