मुंबई : महायुतीची ऐतिहासिक प्रचारसभा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात झाली. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले होते. या सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी शरद पवारांना चॅलेंज दिलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.‘या शिवतीर्थावरून बाळासाहेबांचा आवाज घुमत होता. आज त्यांच्या आत्म्याला वेदना पोहोचत असतील. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना धोका दिला. शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला. राम मंदिराला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी मुंबईवर हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले आहे. जो काँग्रेस सावरकरांना शिव्या देतो, त्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. मी शरद पवारांना चॅलेंज देतोय, तुम्ही राहुल गांधींकडून हे बोलून दाखवा, सावरकरांचा कधीच अपमान करणार नाही. आता त्यांचं तोंड बंद केलं आहे. मी आयुष्यभरात सावरकर यांच्याबद्दल चुकीचं बोलणार नाही, असं राहुल गांधी यांच्याकडून बोलून दाखवा. पण ते असं बोलणार नाही.‘महाराष्ट्राच्या मातीसोबत यांनी धोका दिला आहे. तेव्हा एक काळ होता शिवसेनेची ओळखी ही घुसखोरांना पिटाळून लावणारी होती. पण आज बौद्ध, जैन, शिख यांना आश्रय देण्यासाठी विरोध करत असतात. या आघाडीने पूर्ण देशाला धोका दिला आहे. ज्या कसाबने मुंबईत गोळीबार केला. त्याला ही लोक क्लिन चिट देत आहेत. ज्या पाकिस्तानला जगात कुणी मानत नाही. सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकवर आघाडीचे लोक बोलत आहेत. सैनिकांचा ही लोक अपमान करत आहेत’, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
पंतप्रधान मोदींचे शिवतीर्थावरून शरद पवार यांना चॅलेंज
RELATED ARTICLES