Monday, December 16, 2024
घरदेश आणि विदेश'महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम, और अयोध्ये का राम' मुख्यमंत्री शिंदे...

‘महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम, और अयोध्ये का राम’ मुख्यमंत्री शिंदे यांची नवीन घोषणा

प्रतिनिधी : एकीकडे देशभक्ती आहे. दुसरीकडे देशद्रोही विचार करणारे आहेत. त्यामुळे मोदी पाहिजे की… फिर एक बार…मोदी सरकार. आपल्याकडे आहे, महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम, और अयोध्ये का राम अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईतील शिवाजी पार्कवर मैदानावर महायुतीची मोठी प्रचारसभा पार पडत आहे.

देशातील 140 कोटी जनता काय म्हणते, माझं मत मोदींना. कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवलं. कारण त्यांनी गरीबांचं कल्याण केलं. त्यांनी भ्रष्टाचारा रोखला. त्यांनी अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यात जमा केले. त्यांनी ८० कोटी जनतेला मोफत राशन दिलं. पाच लाखांचा आरोग्य विमा दिला. बेरोजगारांना काम दिलं. देशाला आत्मनिर्भर केलं. मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. देशाचा ऐतिहासिक वारसा जपत आहे, बाबासाहेबांचं संविधान जपण्याचं काम मोदींनी केलं. त्यामुळे देशाला कणखर देशभक्त प्रधानमंत्री पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उबाठाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवल्या. पण सरकार काँग्रेसबरोबर स्थापन केला. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला. मोदी म्हणाले, नकली शिवसेना. बरोबर आहे. तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही. बाळासाहेबांचे विचार नाही. शिवसेना नाही, धनुष्यबाण नाही. आमच्याकडे शिवसेना आहे. तुमच्याकडे शिव्या सेना आहे. रोज शिव्या देणं एवढंच असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments